मुंबई, (निसार अली) : आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असणार्या मार्वे समुद्र किनार्यावर अस्वच्छ प्रसाधनगृह असल्याने पर्यटकांची कुचंबणा होत आहे.
मनोरी बेट ते उत्तन समुद्र किनारा तसेच प्रसिद्ध एस्सेल वर्ल्ड, जगप्रसिद्ध पागोडला जाण्यासाठी पर्यटक मार्वे समुद्र किनार्याचा वापर करतात. येथूनच बोट पकडून त्यांना या पर्यटन स्थळांवर पोहोचता येते. त्यामुळे मार्वे समुद्र किनार्यावर नेहमीच हजारो पर्यटकांचा वावर असतो. असे असूनही या ठिकाणी असणार्या प्रसाधनगृहाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
प्रसाधनगृहात पाणीही नसते, अशी परिस्थिती आहे. तसेच अस्वच्छता असूनही पाच रुपये आकारले जात आहेत. महाराष्ट्र पर्यटन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. किनार्यावर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही आहे.
या ठिकाणी स्वच्छ आणि मोठे प्रसाधनगृह असावे, अशी मागणी पर्यटक करत आहेत.
प्रतिक्रिया
मी दिल्लीतुन जगप्रसिद्ध पागोडा पाहण्यासाठी आले. मार्वे किनार्यावरील प्रसाधनगृहाची दुरवस्था पाहुन चीड़ येत आहे. प्रशासनाने स्वच्छ आणि मोठे प्रसाधनगृह येथे बांधावे. – रीना खान. पर्यटक