मुंबई, (निसार अली) : ओहोटी लागल्याने मार्वेजवळील समुद्रात आज मार्वे- मनोरी फेरी बोट अडकली. यात सुमारे दोनशे पर्यटकांसह ग्रामस्थ होते. सकाळी आठच्या दरम्यान ही घटना घडली. आयएनएस हमला नौदलातील सैनिकांना याची माहिती मिळताच त्यांनी छोट्या मोटर बोटींचा वापर केला आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यात अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळवले. सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी भरती आल्यानंतर बोट परत किनार्यावर आली. या दरम्यान बोट सेवा बंद होती. दुपारी १२ वाजता फेरी पूर्ववत सुरू झाली
समुद्राला ओहोटी आणि मोठी बोट असल्याने ही घटना घडली. तसेच आम्ही अनेक वेळी मार्वे समुद्र किनार्यावर जेट्टी बांधण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. – रॉकी कोळी, अध्यक्ष मनोरी कोळी ग्रामस्थ मंडळ”