रत्नागिरी : मार्लेश्वर देवस्थान हे सह्याद्री पर्वत रांगामधील गुहेमध्ये असलेले नितांत सुंदर ठिकाण आहे. पर्वतावरुन येणाऱ्या प्रचंड मोठ्या धारेश्वर धबधब्यामुळे हे पवित्र स्थान पर्यटकांच्या मनाला भूरळ पाडणारे आहे. या देवस्थानाच्या विकासामुळे देशातील पर्यटकांच्या तसेच भाविकांच्या संख्येत वाढ होऊन स्थानिक नागरीकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी व्यक्त केला.
‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मार्लेश्वर या पर्यटन स्थळाच्या विकास कामाचे उद्घाटन पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
या नयनरम्य ठिकाणी येण्याऱ्या पर्यटकांचा ओघ पाहता राज्य शासनाने सदर ठिकाण ‘क’ वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषीत केले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी १० लाख ६५ हजार रुपयांच्या कांमाना शासनाने मुंजरी दिली असून यामध्ये या ठिकाणी भक्तनिवास व सभामंडप बांधणे, सुलभ शैाचालय बांधणे तसेच पदपथ बाधणे या कामांचा यामध्ये समावेश आहे.
यावेळी आमदार सदानंद चव्हाण, मारळ ग्रामपंचायतीचे सरपंच संदेश भेासले तसेच भाविक उपस्थित होते.