मुंबई, 16 जुलै : भारतीय निर्देशांकांनी आज सलग दुस-या दिवशी सकारात्मक व्यापार केला. आयटी, फार्मा आणि बँकिंग शेअर्सनी या वृद्धीत मोठा वाटा उचलला. निफ्टी १.१५% किंवा १२१.७५ अंकांनी वाढला. १०,५०० च्या पातळीपुढे राहत निफ्टी १०,७३९.९५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने १.१६% किंवा ४१९ अंकांची वृद्धी घेत ३६,४७१.६८ वर विश्रांती घेतली.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १०५८ शेअर्सनी नफा कमावला तर १५१२ शेअर्सनी घसरण घेतली. १५८ शेअर्स स्थिर राहिले. इन्फोसिस (९.५१%), बीपीसीएल (६.९०%), सिपला (५.५५%), एमअँडएम (३.४२%) आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज (३.६४%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर भारती इन्फ्राटेल (७.०४%), टेक महिंद्रा (२.६६%), आयटीसी (२.४४%), झी एंटरटेनमेंट (२.२२%) आणि आयओसी (१.९३%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅपनी ०.५०% ची वृद्धी तर बीएसई स्मॉलकॅपने ०.२३% ची घसरण अनुभवली. सर्व सेक्टरल निर्देशांक आज सकारात्मक स्थितीत दिसून आले.
इन्फोसिस लि.: इन्फोसिसच्या २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहिचा अंदाज सर्व पातळ्यांवर नफ्याचा ठरला. परिणामी आजच्या व्यापारी सत्रात कंपनीचे शेअर्स ९.५१% वाढले व त्यांनी ९१०.९९ रुपयांवर व्यापार केला.
कॅडिला हेल्थकेअर लि.: कंपनीला डॉक्सिसायक्लिन इंजेक्शनच्या एसएएनडीए (सप्लिमेंटल अॅब्रिव्हिएटेड न्यू ड्रग अॅप्लिकेशन) ला अमेरिकी एफडीएची परवानगी मिळाली. हे प्रति बाटली १०० मिलिग्राम येते. कंपनीचे स्टॉक्स १.९६% नी वाढले व त्यांनी आजच्या व्यापारी सत्रात ३६१.५० रुपयांवर व्यापार केला.
एलअँडटी: एलअँडटी कंपनीने वित्तीय वर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहित अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केल्याचे नोंदवले. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ०.८०% नी वाढले व त्यांनी ९१९.५० रुपयांवर व्यापार केला. कंपनीचा निव्वळ नफा २.६% नी घसरला तर महसुलातही २.१% ची घट झाली.
देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने भारतीय रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत काहिशी घसरण घेत ७५.१९ रुपयांचे मूल्य अनुभवले.
आजच्या व्यापारी सत्रात पिवळ्या धातूने एमसीएक्सवर फ्लॅट कामगिरी केली. कोरोना विषाणू संसर्गाची वाढती संख्या आणि अमेरिका-चीन दरम्यानच्या वाढत्या व्यापार तणावामुळे सोन्याच्या किंमतीतील हालचालींना आधार मिळाला.
एफटीएसई १०० कंपनीने ०.५४% तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.०२% नी घसरण घेतल्याने युरोपियन मार्केटने नकारात्मक संकेत दिले. अमेरिका-चीनदरम्यानचा व्यापारी तणाव आणि वाढत्या कोव्हिड-१९ च्या केसेसमुळे आजच्या सत्रात जागतिक बाजाराने नकारात्मक व्यापार दर्शवला. नॅसडॅकचे शेअर्स ०.५९% नी वाढले. निक्केई २२५ चे शेअर्स ०.७६%, नी घसरले. हँगसेंगचे शेअर्सदेखील २.०० टक्क्यांनी घटलेले दिसून आले.