मुंबई, 22 मे : सोमवारी २५ मेपासून देशांतर्गत विमाने पुन्हा सुरू होत आहेत. अशा प्रकारच्या सकारात्मक बातम्यांनी निफ्टीवर एअरलाइन्स शेअरला आधार दिला. स्पाइसजेट लिमिटेडमध्ये ५ टक्क्यांची वृद्धी दिसून आली. तिचा शेअर २.०० रुपये किंवा ४.९० टक्क्यांनी वाढून ४२.८५ रुपयांवर बंद झाला. देशांतर्गत विमाने पुन्हा सुरू होण्याच्या घोषणेमुळे इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या स्टॉकमध्येही वृद्धी आली. हा ६८.१५ रुपये किंवा ७.४७ टक्क्यांच्या वृद्धीसह ९८.०५ रुपयांवर बंद झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. एअरलाइन्ससह आयटी टेक्नोलॉजी, केमिकलस आणि आवश्यक सामान पुरवठा करणा-या सेक्टर्सनी गुरुवारी व्यापार समाप्त झाल्यावर मोठ्या प्रमाणात नफा कमावला.
भारतीय इक्विटी मार्केट गुरुवारी सकाळी तीव्र नफा नोंदवत सुरू झाले. तथापि, ट्रेडिंग सेशनच्या अखेरीस एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्राने कमकुवतपणाचे संकेत दर्शवले. त्यामुळे संपूर्ण सेशनमध्ये मोजकाच नफा झाला.
मॅन्युफॅक्चरिंग व ऊर्जा क्षेत्र रेडझोनमध्ये:
मागणीतील कमतरता आणि लोकांची आक्रसणारी कमाईची क्षमता यामुळे मॅन्युफॅक्चरिंग आणि ऊर्जा क्षेत्रातील शेअर्सना जबरदस्त फटका बसला. ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे निफ्टी एनर्जी ०.००५ टक्क्यांची घसरण घेत १२,५०२.६० अंकांवर बंद झाला. प्रत्येक सिझनमध्ये शानदार रिटर्न देणारा हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड १% च्या घसरणीसह १,९७०.७० रुपयांवर बंद झाला.
इन्फ्राने स्टॉक मार्केटची गती धीमी केली:
इन्फ्रा सेक्टरमध्ये इक्विटी शेअर्सनी आज व्यापारात शेअर बाजाराची गती धीमी केली. लार्सन अँड टुब्रो लिमिटेड बुधवारी निफ्टी ५० चार्टवर टॉप इन्फ्रा ब्रँड्सपैकी एक ठरला. गुरुवारी त्याच्या शेअरमध्ये १४.०० रुपये किंवा १.६% ची घट झाली. तो चार्टवर ८२१.०० रुपयांवर बंद झाला.