रत्नागिरी दि.20:- सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या 08 मार्च 2019 च्या शासन निर्णयान्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टँडई 2020/प्र.क्र.23/अजाक दि. 09 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी सहायक आयुक्त, समाजकल्याण यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय विभाग, कुवारबाव ता.जि. रत्नागिरी येथे शासन निर्णयातील नमूद सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे सहायक आयुक्त, समाजकल्याण , रत्नागिरी यांनी कळविले आहे.












