मालाड, (निसार अली) : केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्या निर्णयाचा आज मालवणीत विरोध करण्यात आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, भारतीत कम्युनिस्ट पक्ष यांनी सरकारविरोधात मोर्चा काढून निषेध केला. गेट क्रमांक सहा मधून मोर्चाला सुरूवात झाली.
मोर्चात नोटा बंदी व जीएसटीचा निषेध व्यक्त करत मोदी आणि फडणवीस सरकार विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या. कॉ. चारुल जोशी, कॉ.ए. सी. श्रीधरन, कॉ. के. आर.अशोकाने, रईस शेख, समीर सय्यद, अब्राहम थॉमस आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मालवणीतील नागरिकांनी ही मोर्चात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.