रत्नागिरी, प्रतिनिधी : राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचं काम भाजप करत असून महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला असल्याचा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. ते आज खेडमधील कोरेगाव येथे कोव्हिडं सेंटरच्या उद्घाटनाला आले असता बोलत होते.यावेळी भास्कर जाधव म्हणाले की, 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं, आणि तेव्हापासून भाजपचा सुडाचा राजकारणाचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची कृती, ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला संपवण्याचीच आहे, आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे महाराष्ट्रातील भाजपचे नेते आहेत. अनिल देशमुख असतील, अनिल परब असतील, किंवा भाजपच्या कार्यकारिणी मिटिंगमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ईडीने चौकशी करावी अशा पद्धतीचा ठराव होतो. भुजबळ साहेबांनी नुसतं मत प्रदर्शित केलं तर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सांगतात तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, जपून बोला याचा अर्थ केंद्रातील सत्तेचा दुरूपयोग हा मराठी माणसाला संपवण्यासाठी भाजप करत असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी यावेळी केला. राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचं काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे, आणि त्याचाच हा परिपाक म्हणजेच अनिल देशमुख असतील, प्रताप सरनाईक असतील, यांच्या घरावर सातत्याने होणाऱ्या रेड असल्याचं भास्कर जाधव यावेळी म्हणाले. याचा मी जाहीर निषेध करत असल्याचं भास्कर जाधव यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी फक्त टीका करावी – आमदार जाधव
केंद्रात नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र बाकी सगळे इंद्र, आणि तोच प्रकार आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत सातत्याने घडतोय, त्यांनी फक्त टीका करावी, आरोप करावेत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि संस्काराला काळिमा फासण्याचं काम करावं एवढंच त्यांचं काम सुरू आहे














