मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर तथा कुसमाग्रज यांचा आज जन्मदिवस ‘ मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून महानायक अमिताभ बच्चन यांनी सर्वांना मराठी दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी ट्विटर ट्विट करत मराठी भाषेबाबत गौरवोद्गार काढले आहेत.
“इंग्रजी मध्ये ‘A’ फॉर *Apple* ने सुरु होते आणि शेवटी ‘Z’ फॉर *Zebra* वर येऊन संपते. शेवटी इंग्रजी जनावर बनवून सोडते. पण मराठी ही विश्वामधील एकमात्र भाषा लिपी आहे जी व्यक्तिला ‘अ’ म्हणजे “अज्ञानी” पासून शेवटी ‘ज्ञ ‘ म्हणजेच “ज्ञानी” बनवून टाकते, अशा भाषेला मी मुजरा करतो,” असे ट्विट अमिताभ यांनी केले आहे.
अमिताभ यांचे ट्विट पाहण्यासाठी येथे http://www.twitlonger.com/show/n_1splj9g क्लिक करा.