मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात सकल मराठा क्रांती महामोर्चाच्यावतीने आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज भेट घेतली.
मराठा आरक्षण व इतर मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन शासन सकारात्मक निर्णय घेईल. मराठा समाजाच्या विकासासाठी सारथी संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, मराठा समाजाच्या मुलांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृहांसाठी जागा, आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत आदी निर्णय घेतले आहेत. याबरोबरच मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर शासन गंभीर असून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सहकार मंत्र्यांनी उपोषणकर्त्यांना सांगून उपोषण मागे घेण्याची विनंती केली.