
राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली आणि हे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. याबाबत बोलताना बाळ माने म्हणाले, की भाजप सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करून मराठा समाजाला मिळवून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयातही टिकवले. मात्र महाविकास आघाडीच्या हलगर्जीपणामुळे ते मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे समस्त मराठा समाजाचा विश्वासघात झाला असल्याचं बाळ माने यावेळी म्हणाले.
तसेच ज्यावेळी शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये होती, त्यावेळेला त्यांची भूमिका आरक्षणाच्या बरोबरची होती, आणि आज हे असं म्हणतात की हे आरक्षण केंद्राने करावं म्हणून, म्हणजे ज्यावेळेला राज्यामध्ये आरक्षण दिलं गेलं तेव्हा त्यांना हे आठवलं नाही. नाचता येईना अंगण वाकडे अशा प्रकारची परिस्थिती राज्य सरकारची असून, शिवसेना ही पुरती गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचं माने यावेळी म्हणाले..