नवी दिल्ली: महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या भावना अत्यंत तीव्र झाल्या असून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा त्वरित मार्गी लावावा अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेत केली.
छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला आरक्षण दिले होते यामध्ये मराठा समाजाचा देखील समावेश होता. स्वातंत्र्यानंतर मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले आहे. गेल्या वर्षी निघालेल्या ऐतिहासिक मराठा मोर्चाची दखल संपूर्ण जगानी दखल घेतली होती.
महाराष्ट्रात आज अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली ही परिस्थिती अधिक चिघळू नये महणून मराठा समाजासाठी ज्या लोकांनी प्रमुख लढा दिला त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित चर्चेसाठी बोलवावे आणि त्यांच्या मागण्या एकूण हा प्रश्न मार्गी लावावा.
त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठा समाजाच्या मागण्या ऐकून मार्गी लावाव्यात असे ही खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले.