
मुंबई : मालवणी येथे सामाजिक सदभावना मंचच्या वतीने वाढती महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरणाचा विरोध करण्यासाठी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी नीतीच्या विरोधात आज मानवी साखळी बनवून विरोध दर्शविण्यात आला. या प्रसंगी माकपचे कॉ. एसी. श्रीधरन, अब्राहम थॉमस, सिपीआयचे रईस मोहम्मद शेख, राष्ट्र सेवा दलाचे निसार अली, टीडीएफचे उपाध्यक्ष लालजी कोरी, आपचे निशांत राठोड आदी उपस्थित होते.