
नागरिकांनी सतर्क राहण्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून, आज सकाळपासून देखील पावसाची संततधार सुरू आहे. खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी ओलांडून पुन्हा धोक्याच्या पातळीच्या जवळ आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी दिले आहेत. तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी केलं आहे.
सुरक्षेचा उपाय म्हणून चार दिवसांपूर्वीच रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF )टीम दाखल झाल्या आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड, पोलादपूर व महाड ही तिन्ही शहरे पुन्हा पुराच्या छायेत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चिपळूण,खेड तालुक्यातील नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहनही पालकमंत्री यांनी केले आहे.