
नमन व जाखडी पथकास ५० हजारांचे अनुदान जाहीर केल्याबद्दल मंत्री आशिष शेलार यांचा जाहीर सत्कार
ॲड्. दीपक पटवर्धन यांचाही यथोचित सत्कार
रत्नागिरी दक्षिण, रत्नागिरी उत्तर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते, लोककलावंत यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
चिपळूण : भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा बुधवारी (ता. १५) चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका येथील सहकार भवनमध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात झाला.

कोकणातील नमन व जाखडी लोककला टिकवून ठेवण्यासाठी तसेच कलाकारांना हक्काचे पाठबळ मिळवून देण्यासाठी नमन व जाखडी पथकास ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. त्यानिमित्त या मेळाव्यात मंत्री श्री. शेलार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर आमदार प्रमोद जठार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, सौ. ज्येष्ठ संचालिका स्मिताताई चव्हाण, चित्रपट महामंडळाचे प्रमुख कार्यवाह, अभिनेते सुशांत शेलार, भाजपचे रत्नागिरी दक्षिण ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, भाजप नेते वैभव खेडेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, जि. प. गटनेते प्रमोद अधटराव, चिपळूणच्या उपनगराध्यक्ष सौ. रुपाली दांडेकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, मोर्चा व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आणि महाराष्ट्र शासनाचा सहकार गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ॲड्. दीपक पटवर्धन यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.














