मतदारसंघातील जनतेला उद्योगमंत्री ना.उदय सामंत यांचे साष्टांग दंडवत
रत्नागिरीकरांची सेवा करणे हेच उद्दिष्ट :- उद्योगमंत्री ना. उदय सामंत
रत्नागिरीच्या सुपुत्राची कोरियाने देखील घेतली दखल
रत्नागिरी : महाराष्ट्रचे उद्योमंत्री ना. उदय सामंत सध्या परदेश दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागताचे डिजिटल बोर्ड साऊथ कोरियामध्ये झळकल्याचे चित्र साऊथ कोरियात पाहायला मिळाले. LG सायन्स सेंटर मध्ये राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचा स्वागताची जय्यत तयारी साऊथ कोरियात करण्यात आली होती. दरम्यान आज हे सगळं भाग्य रत्नागिरी-संगमेश्वर मतदारसंघातील जनतेने मला चार वेळा निवडून दिले म्हणून मी उद्योग मंत्री झालो, म्हणुन साऊथ कोरियाला आलो त्यामुळे माझ्या मतदारसंघातील जनतेला साष्टांग दंडवत करत असल्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यावेळी म्हणाले. विविध उद्योग कंपन्यांशी गुंतवणूकीच्या कामासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत साऊथ कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रमध्ये स्वागत करणे ही वेगळी गोष्ट आहे, मात्र परदेशात साऊथ कोरिया मध्ये स्वागताचे डिजिटल बॅनर लागणे, हे महाराष्ट्रच्या दृष्टीने वैभवाची बाब आहे. उदय सामंत यांच्या स्वागतावेळी LG कंपनीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी ना. सामंत म्हणाले की, महाराष्ट्राचे उद्योगमंत्री बनण्याचे स्वप्न जे सत्यात उतरले त्याचे भाग्यविधाते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे आहेत. यांनी मला उद्योग मंत्री केले नसते तर हा योग माझ्या नशिबी आला नसता असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोघांचेही आभार मानले. तसेच ज्या लोकांनी विश्वास ठेवून मला निवडून दिले, त्यांची आयुष्यभर सेवा करणे हेच उद्दिष्ट ठेऊन कार्यरत राहीन आणि कोकणी जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं उद्योगमंत्री ना. उदय सामंत यावेळी म्हणाले.