मुंबई, 7 june (निसार अली): अभिनेता सोनू सूद याच्या मदतकार्यावरून शिवसेना आणि भाजपात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख सोनू सूदला घेऊन मातोश्रीवर गेले. तसेच अस्लम शेख यांनी सोनू सूद याच्या समर्थनार्थ ट्विट देखील केले होते. आज सामना दैनिकातील रोखठोक या सदरातून शिवसेनेचे खासदार यांनी सोनू सूदवर टीका केली होती. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लढविले जात होते.
यावर अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला.. मातोश्रीवर पोहोचले असे खोचक ट्विट शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.
काही वेळापूर्वी सोनूने मराठीत ट्विट करत ‘स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरित मजुरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाहीये. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावलं त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलंय.’ असं म्हटलं आहे