मुंबई, (निसार अली) : एका मानसिक रुग्णाला बेदम मारहाण झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना चारकोपमधील भाबरेकर नगरात आज शुक्रवारी घडली. संजय तिवरे असे मरण पावलेल्याचे नाव आहे. त्याला गुरुवारी रात्री मारहाण झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय हा त्याच्या ओळखीचे असणार्या सुनील मोहिते यांच्या घरी गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास पाणी पिण्यासाठी गेला. तिथे त्याचा काहीजणांशी वाद झाला. वाद विकोपाला जाऊन आरोपी अजित मोहिते, सुनील मोहिते, विशाल मोहिते, विजय गायकवाड़ आणि दोन महिला यांनी संजयला बेदम मारहाण केली.
पोलिसांना याबाबत समजताच संजयला कांदिवली पश्चिमेतिल शताब्दी रुग्णालयात त्याला दाखल केले गेले. मात्र सकाळी ११ वाजता तो मरण पावला. संजयचे वडिल एकनाथ यांच्या तक्रारी सहा जणांना अटक करण्यात आली.