रत्नागिरी (आरकेजी) : मराठी सक्तीचा विषय पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं हाती घेतला आहे. याच मराठीच्या मुद्द्यावरून लांजामध्ये मनसेने आज अल्टिमेटम मोर्चा काढला.
मुंबई, पुणे,ठाणे, नाशिक आणि सोलापूरनंतर मराठी भाषेतून बॅकेचे आणि सरकारी कार्यालयांचे व्यवहार असावेत असा आग्रह धरणाऱ्या मनसेने आज कोकणात या संदर्भात बॅकाना अल्टिमेटम दिलं. आस्थापनावरील पाट्या , सरकारी तसेच खाजगी कार्यालय ,त्याचबरोबर बँकांमधील व्यवहार मराठी राजभाषेत व्हावेत यासाठी मनसेनं पुन्हा पुढाकार घेतला आहे. गुजरातमध्ये गुजराती , कर्नाटकमध्ये कानडी, तामिळनाडूमध्ये तामिळ भाषेचा वापर केला जातो, मात्र महाराष्ट्रात हे का होत नाही, यासाठी मनसेन आंदोलन पुकारलं आहे. त्यासाठी संपुर्ण राज्यभर आंदोलन केलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आज लांजा शहर आणि ग्रामिण भागातील बॅकांचे व्यवहार मराठीतून व्हावेत यासाठीचं अल्टिमेटम देण्यासाठी शहरातून आज मनसेनी मोर्चा काढला. खेडचे नगराध्यक्ष आणि कोकणातील मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यासह लांजा तालुक्यातील मनसेचे अनेक पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत अशा घोषणाबाजी करत लांजा शहर मनसेच्या मोर्चांनी दणाणून गेले. बॅकाप्रमामे सरकारी कार्यालयात सुद्धा मराठीतून व्यवहार झालाच पाहिजे असा आग्रह मनसेनी धरला आहे. या संदर्भात लांजा तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. मराठी भाषेतील पाट्या आणि व्यवहारासाठी आज लांजा शहरातून हि अलटिमेटम रॅली फिरली. कोकणात सेनेचा बालेकिल्ला असताना मराठीच्या मुद्यावरून मनसे आपली कोकणातली जागा या मुद्यावरून भक्कम करण्याच्या प्रयत्नात पहायला मिळणार आहे.