रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरीतल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात आज रक्षाबंधनाचा उत्साह दिसून आला. त्यामुळे मनोरुग्णांना काही क्षण का होईना बहिणींची माया मिळाली. मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णानां नातेवाईक आहेतच असे नाही, अशा मनोरुग्णांना मायेचा आधार मिळावा यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून सोमवारी मनोरुग्णालयात रक्षाबंधन साजरी करण्यात आली. यावेळी रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. आपल्यालाही बहिण आहे याची जाणीव कळत नकळत का होईना त्यांना झाली होती. यातल्या अनेक मनोरुग्णांना नातेवाईकही नाहीत. रक्षाबंधनाने मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. मनोरुग्णांना हाच मायेचा आधार समाजातील मंडळीने द्यावे असे आवाहन मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी केले.