मालाड, ता.20 (निसार अली) : मनोरी गावात 300 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलं. बोरिवलीचे भाजप आमदार सुनील राणे यांच्या वतीने अथर्व एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सोमवार दिनांक19 जुलै रोजी मनोरीतील भंडारवाडा येथे फरेरा फार्म येथे 300 ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले. आहे.मनोरीतील नागरिकांना समुद्र ओलांडून मार्वे येथे पालिकेच्या किंवा इतर ठिकाणी जावं लागतं आहे आणि अनेक वेळी ऑनलाईन नोंदणी ही होत नाही. थेट लसीकरण केंद्रावर गेल्यावर तासनतास रांगा लावूनही उपयोग होत नसल्याने आमदार सुनील राणेंनी मनोरी गावातील नागरिकांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवल्याने ग्रामस्थांनी त्यांचं कौतुक केलं आहे. तसेच अशा अनेक मोहीम आम्ही राबवू अस ते राणे म्हणाले














