
मुंबई : महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी मा. खासदार मनोज कोटक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्याअध्यक्षपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष पदी भारत सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या उपाध्यक्ष पदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा मनःपूर्वक आभारी आहे, असे कोटक यांनी म्हटले आहे.
कोटक म्हणाले की, महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृती अधिक बळकट आणि सक्षम करण्याच्या उद्दिष्टाने अत्याधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उभारणे, नवीन क्रीडा संधी निर्माण करणे आणि जागतिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करणे हे माझे प्रमुख प्राधान्य असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या दूरदर्शी नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा विकास अधिक वेगाने, नियोजनबद्ध आणि व्यापक पातळीवर घडवून आणण्यासाठी मी पूर्णतः कटिबद्ध आहे.














