रत्नागिरी : कोरोनामुळे फळांचा राजा हापूसही लॉकडाऊन झाला आहे. आज गुढी पाडव्याच्या दिवशी कोरोनाला हरवण्यासाठी लोकांनी सुद्धा अनेक परंपरांना फाटा दिला. आंब्याच्या हंगामात नवं करण्याची गुढी पाडव्याला परंपरा कोकणात आहे. कोकणात या दिवशी मोठ्या प्रमाणावर आंबा बाजारात येतो. त्यामुळे त्याचा भाव देखील कमी असतो. त्यामळे आजपासून आंबा खरेदी करून त्याची गोडी चाखण्याची कोकणातली परंपरा आहे. असं असलं तरी मात्र कोरोनाच्या पाश्वभुमीवर या परंपरेला रत्नागिरीकरांनी बगल दिली. आंबा बाजारात येवून सुद्धा सध्या आंबा खरेदीकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे गेले कित्येक वर्षांची परंपरा आज मोडली गेली. आंब्याचा दर कमी असूनही संचारबंदीमुळे कोणी गि-हाईक फिरकलंच नाही.