रत्नागिरी (आरकेजी) : रत्नागिरीतल्या हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रात परदेशी आंबा निर्यातीसाठी आणखी एक दालन खुले होणार आहे. या केंद्रात आंब्याच्या परदेशवारीसाठी कोकणात रत्नागिरीत निर्यात सुविधेसाठी प्रमाणिकरण उपलब्ध होणार आहे. त्यासाठी येथील हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रात प्रमाणिकरणासाठी नॅशनल प्लँट पोटेक्शन ऑर्गनायझेशन नवी दिल्ली, ऍग्रीकल्चर अँड पोसस, प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अथोरिटी (अपेडा) आणि कृषी व सहकार विभाग, भारत सरकार यांच्या अधिकाऱयांनी तपासणी केली.
अधिकाऱ्यांच्या समितीमध्ये एनपीपीओचे आर.के.शर्मा, योगेश पांडे, अपेडाचे लोकेश गौतम, भारत सरकार कृषी विपणन विभागाचे धिंग्रा, पणन मंडळाचे डॉ. भास्कर पाटील, मिलींद जोशी, नारकर उपस्थित होते.
जिल्हास्तरावर आंबा विकी करण्यासाठी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने बागायतदारांच्या आंब्याचा लिलाव बाजार समितीच्या आवारात व्हावा यासाठी नव्याने शेडची सुविधा उभारलेली आहे. यावर्षीपासून याठिकाणी आंबा लिलाव उपलब्ध होणार आहे. कोकणातून मोठ्या पमाणात उत्पादीत होणाऱया हापूस आंब्याचा व्यापार संपूर्ण देशात वाढविण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. गतवर्षीं कलकत्ता, गुहावटी, केरळ, दिल्ली, कर्नाटक, आंध्रपदेश, तामिळनाडू, चेन्नई अशा मोठ मोठ्या भागातील मार्केटमध्ये आंबा विकि केंद्रे उभारली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पणनच्या नावाने त्याठिकाणी येथील आंबा उत्पादक शेतकऱयांना आंब्याचे मार्केटींग करण्यासाठी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनस्तरावरून हे पयत्न केले जात असताना रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना स्थानिक स्तरावर आंबा लिलाव केंद्र आदी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. आंब्याचा लिलाव बाहेरील व्यापाऱयांमार्पत करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी आंबा खरेदीदारांना बाजारा समितीच्या केंद्राच्या ठिकाणी पाचारण केले जाणार आहे. एकीकडे ही सुविधा निर्माण होत असताना यापूर्वीपासून येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या उभारण्यात आलेल्या आंबा निर्यात सुविधा केंद्रात उष्णजल प्रकियासारखी सुविधाही उपलब्ध झाली. त्यानंतर आता या सुविधा केंद्राचे प्रमाणीकरणासाठी झालेल्या पाहणीमुळे आंब्याची अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, आदी देशांमध्ये निर्यातीची सुविधा कोकणात रत्नागिरी येथे उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सद्या स्थितीत ही सुविधा सद्गुरु एंटरपायझेस यांच्यामार्पत चालविण्यात येत आहे.