
रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण किनाऱ्यांवर उंच लाटा उसळत आहेत. सव्वाचार ते साडेचार मीटर उंचीच्या लाटा रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टी भागाला धडकत होत्या. खवळलेला समुद्र किनारपट्टी भागात पहायला मिळत आहे. मांडवी किनाऱ्यावर साडेचार मीटर उंचीच्या लाटा धडक देत आहेत. लाटांच्या मार्यामुळे मांडवी जेटीचा अर्धाभाग पाण्याखाली गेला.
काही अतिउत्साही पर्यटक लाटा पाहण्यासाठी मांडवी किनाऱ्यावर आले आहेत. २४ तासात कोकण किनारपट्टीवर अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान दिला आहे. उद्या मोठी भरती असल्याने किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.