
रत्नागिरी,(आरकेजी) : समुद्री लाटांच्या मार्यांनी मांडवी जेटी दुभंगली गेली आहे. ही जेटी आता पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.
गेट वे आँफ रत्नागिरी असे म्हटले जाणाऱ्या मांडवी जेटीला सध्या लाटांचा फटका बसत आहे. रत्नागिरीमध्ये आलेल्या पर्यटकांचे आवडतं ठिकाणी अशी मांडवी जेटीची ओळख आहे.
जेटी ब्रिटिशकालीन आहे.त्र जून महिन्यात कोकण किनारपट्टीवर समुद्राला मोठी भरती आली होती. समुद्राच्या उधाणाचा फटका मांडवी जेटीला बसला आहे. मांडवी जेटीला समुद्राच्या मोठ्या लाटांनी धडक दिली. मांडवी जेटीचा काही भाग धोकादायक बनला आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने सुरक्षितता म्हणून जेटी बंद केलीय. जेटीच्या शेवटच्या भागाला तीन चे चार फुटांचे भगदाड पडले आहे.
.