मुंबई, (निसार अली) : एका खासगी वृत्तवाहिनीचे प्रमुख आणि पत्रकार अफझल अन्सारी यांना जबर मारहाण करण्यात आल्याची घटना मालवणी येथे घडली आहे. वासीम खान याच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात येत आहे. त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी मालवणीत चोरी झाली होती. चोरांची माहिती अफझल यांनी दिल्याने पोलिसांना दिली होती. त्यामुळेच हा हल्ला केला गेला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पत्रकारांवर होणार्या हल्ल्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्याम झळके यांनी केली आहे. अनेक संस्था आणि संघटना अफझल अन्सारी यांच्या समर्थानात पुढे आल्या आहेत यात राष्ट्रसेवा दल मालवणी विभाग, नवविचार आंदोलन, प्रोग्रेसीव्ह मुस्लिम फ्रंट, सकल ओबीसी यांचा समवेश आहे.
पत्रकारांसाठी विशेष कायदा करून सरकार ने त्यांना सुरक्षा द्यावी. त्यांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्सारींच्या हल्लेखोरांवर काही केले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू ”असा इशारा सकल ओबीसी समाजाच्या उपाध्यक्षा वैशाली महाडीक यांनी दिला आहे.