
मुंबई, (निसार अली) : मालवणी येथे दिनांक 18 ऑगस्ट रोजी सर्वधर्मीय ईद समोरोह उत्साहात संपन्न झाला. सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत असताना मालवणीसारख्या मुस्लिमबहुल वस्तीत विविध संस्था संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी सर्व धर्मीयांनी ईद उत्साहात साजरी केली.
या वेळी हम संस्थेचे सरताज कापडी, जान्हवी टक्के, सकल ओबीसी समाजच्या कांचन नाईक जांबोटी,राष्ट्रसेवादलच्या नमिता मिश्रा, मनोज परमार, साक्षर वेल्फेअर सोसायटीच्या स्नेहा माली पेडी, सफल विकास वेलफेअर सोसायटीचे सय्यद निसार अली, वैशाली महाडिक, नवा शोध-नवा आदर्शचे प्रतीक झेपले उपस्थित होते.
कॉम्रेड ए. सी .श्रीधरन यांना या प्रसंगी सन्मानित करण्यात आले. तसेच देवरुखचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आरते यांनी मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन करत सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार इर्शाद शेख आणि रुबिना खान यांनी उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिरकूर्माच्या मेजवानी नंतर पाहुण्यांना तुळशीचे रोपटे देण्यात आले.














