मुंबई (निसार अली) : मालाड येथील मालवणी क्रमांक -६ मध्ये स्काउटर्स वसाहतीत असणार्या साईसावली मंदिराच्या आवारातच काही गर्दूल्ले राजरोजपणे नशा करत आहेत. मंदिर व्यवस्थापनाने मालवणी पोलीस, सहायक पोलीस आयुक्त,पोलीस आयुक्त आणि स्थानिक आमदार यांच्याकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. यामुळे विभागात संतापाची लाट पसरली आहे.
गर्दुल्ल्यांना कोणी हटकण्याच्या प्रयत्न केल्यास ते अंगावर धावून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच महिला आणि मुलींची छेड़ काढण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. नागरिकांनी त्यांच्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवत स्थानिक पोलिसांना निवेदन दिले आहे.