मुंबई, 3 जुलै (निसार अली) : कोरोना या महाभयंकर रोगावर नियंत्रण राखण्याकरिता महाराष्ट्र शासन आणि महापालिका विविध उपाय योजना करत आहेत. त्यानुसार पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मार्गदर्शनाने आणि स्थानिक नगरसेवक वीरेन्द्र चौधरी यांच्या द्वारा क्रमांक 33 मध्ये दिनांक 3 जुलै रोजी , सेंट मॅथ्यूस स्कुल, आझमी नगर रोड, मालवणी येथे महापालिका द्वारा आरोग्य तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.
पालिकेच्या डॉक्टरांमार्फत प्राथमिक आरोग्य तपासण्या करून रहिवाशांना औषधे देण्यात आली तसेच त्यांच्या शरीराचे तापमान, श्वासोच्छवास तपासणी करण्यात आली तसेच मोफत कोविड तपासणी करिता स्वाब टेस्ट घेण्यात आली. यात स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद देत लाभ घेतला. नगरसेवक वीरेंद्र चौधरी आणि पालिकेचे डॉक्टर व आरोग्य खात्याचे कर्मचारी उपस्थित होते.