मालाड, ता.10 (बातमीदार) : काँग्रेसने मालवणीत वाढती महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन केले. नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. मालाडचे प्रभारी आणि मुंबई काँग्रेस महासचिव डॉ. नेकसन नाटके, सुनीता सिंग, फिझा सय्यद इतर पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आंदोलकांनी मोदी सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी करत इंधन दर वाढ मागे घ्या, तसेच गॅस, खाद्य तेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्याची मागणी करत आंदोलन केले. मुंबईत काँग्रेस आक्रमक झाली आहे आणि आंदोलन करत नागरिकांच्या वतीने संताप व्यक्त करत आहे.