मालाड, 23 ऑगस्ट (निसार अली) : मालवणी येथील म. वा. देसाई उद्यानातील कृत्रिम तलावात तसेच प्रवेशद्वार क्रमांक 8 येथील म्हाडा मैदानात पालिकेने बनवलेल्या कृत्रिम तलावात गणेश भक्तांनी दिड दिवसाच्या बाप्पाचे आज विसर्जन केलं. विसर्जनासाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला.
आज मिरवणूक आणि ढोल ताशा नव्हता. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात गणेश भक्तांनी बाप्पाचे विसर्जन केले. रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त होता. पालिका कर्मचारी व अधिकारी यांनीही विसर्जन व्यवस्थित पार पाडावे, यासाठी नियोजन केले होते.