
मालाड, ता.5(निसार अली) : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मालवणीत गेट क्रमांक 7 येथील ईदगाह मैदानात जमाते इस्लामी हिंद च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. ईदगाह मैदान म्हणजे ईद च्या निमित्ताने जिथं नमाज अदा केली जाते तिथं मोठे वृक्षांचे रोपण जमाते इस्लामी च्या कार्यकर्त्याकडून करण्यात आले. पर्यावरण रक्षणाची गरज येणाऱ्या काळात जास्त आहे. तसेच जर आज पर्यावरणाला जपण्यासाठी कार्य केले नाही तर भविष्यात याचा धोका सर्वांना भोगावा लागणार म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवून रक्षण करणे आवश्यक आहे,असे यावेळी सांगण्यात आले.
जमाते इस्लामी च्या वतीने सामाजिक कार्यात अग्रेसर असते.















