मुंबई, (निसार अली) : वाढती महागाई रोखण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. याचा विरोध करत मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली शनिवारी(ता.१२) मालवणीत मोर्चा काढण्यात आला. गेट क्र. ६ येथील नविन कलेक्टर कंपाऊंडमधून मोर्चाला सुरुवात झाली. गेट क्रमांक १ येथे कॉम्रेड ए.सी.श्रीधरन, रईस शेख आणि आम आदमी पार्टीचे अब्राहम थॉमस यांनी मोदी सरकारचा निषेध करत मोर्चाला संबोधीत केले. महागाईमुळे कष्टकरी जनतेचे हाल होत आहेत. सिलिंडर, डिझेल, पेट्रोलचे भाव सातत्याने वाढत आहेत, तरिही कोणत्याही उपाययोजना सरकारकडून करण्यात येत नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले. आम आदमी पक्ष, डी. वाय.एफ. आय, माकप, भाकपचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.