मालाड, ता.11 (वार्ताहर) : मालवणीत अल्पसंख्यांक विकास केंद्राचे उदघाटन जगनाथ मोतीराम अभ्यंकर – अध्यक्ष महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोग यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमात सर्व पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. वंदे मातरम शिक्षण संस्थेचे सचिव फिरोज शेख यांच्या व्यवस्थापनात अल्पसंख्यांक विकास केंद्राची सुरुवात मालवणीत करण्यात आली आहे. या केंद्रात अल्पसंख्यांकांना कश्या प्रकारे शासकीय मदत घेता येईल याचे मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येईल. तसेच स्थानिक रहिवाश्यांच्या समस्यांनाही शासनापर्यंत पोहोचवीण्याचे कार्य होईल असे फिरोज शेख यांनी सांगितले. यासोबतच मालवणी या अल्पसंख्यांक विभागातील सामाजिक व शैक्षणिक व्यथा अभ्यंकर साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या. अध्यक्षीय भाषणात अभ्यंकर यांनी आश्वस्त केले की, विभागातिल शैक्षणिक आरक्षित भूखंडांचा विकास करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. मालवणी गायकवाड नगर येथील रिपेरिंग बोर्डाच्या रहिवाश्यांनी अभ्यंकर साहेबांना त्यांच्या व्यथा निदर्शनास आणून देताच त्यांनी एमएचबी कॉलनीतील 200 पेक्षा अधिक रिपेरिंग बोर्डाचे रहिवाश्यांना म्हाडातर्फे होणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यास सहयोग करतील असे सांगितले. त्या सोबतच अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य आयोग तत्पर आहे. सामाजिक न्याय, समता, शिक्षण तसेच सर्वांना नोकरी इत्यादी गंभीर समस्यांवरही काम करण्यात येईल, अल्पसंख्यांकक विभागाचा सर्वांगीण विकास करण्यास राज्य आयोग प्रयत्नशील आहे असे मत अभ्यंकर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमात जगनाथ मोतीराम अभ्यंकर – अध्यक्ष महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोग, हैदर आझम- भाजप महाराष्ट्र सचिव, जाकीर शिकलगार – अध्यक्ष महाराष्ट्र मायनॉरिटी फोरम, दीपक – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, असलम कुरेशी – काँग्रेस पक्ष, निसार अली – सामाजिक कार्यकर्ते, किरण – सामाजिक कार्यकर्ते, अफझल अन्सारी – पत्रकार, सादिक शाह – अध्यक्ष गायकवाड नगर समिती इत्यादी उपस्थित होते.तसेच प्रसंगी श्रम कार्ड चे वाटप केले.














