मुंबई, (निसार अली) : मालवणीतील अनेक शाळांमध्ये योग दिन उत्साहात साजरा झाला. गेट क्र ६ येथील होली एंजेल शाळा, मदर टेरेसा शाळा, आयडियल स्कूल, भारत माता स्कूल, टाउन शिप शाळा तसेच खारोडीतील दौलत शिक्षण संस्थेच्या मराठी शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग च ज्ञान दिले. मुख्याध्यापक गजानन झाड़े यांनी योगाचे महत्त्व आणि गरज या संबंधी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
या वेळी संस्थाचालक दीपक वैती उपस्थित होते. तसच शिक्षक जी.आर.बाचकर आणि विजय जाधव यांसह माजी मुख्याध्यापक एस.बी.पाटील आदींनी सहभाग नोंदविला.