पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण
मालाड : मालवणी येथे इमारतीच्या वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख तर अन्य दुर्घटनाबाधितांना देखील आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वितरण मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
जुलै महिन्याच्या 16 तारखेला मालाड मालवणी येथील ओल्ड कलेक्टर कंपाऊंड भागातील इमारतीचा वरचा मजला बाजुच्या घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकुण 2 जण मृत्यूमुखी पडले होते तर 13 जण जखमी झाले होते.
याप्रसंगी तहसिलदार विनोद धोत्रे, तलाठी मनिषा नागले आदी मान्यवर उपस्थित होते. मृतांच्या नातेवाईकांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.