मुंबई, (निसार अली) : मालवणी गेट क्रमांक आठ येथील आजमी नगर, महापालिका प्रभाग ३३ मधील अंतर्गत रस्ते खचले आहेत. तसेच मुख्य रस्त्यावरील गटारेही उघडी असून संबंधित यंत्रणेने या ठिकाणी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत, जागोजागी कचराही पसरला आहे, अशी अवस्था या विभागाची झाली आहे.
सेंट पॉल ते सेंट मेथिवस् शाळा येथील रस्त्यावरील पेव्हर ब्लाक काही ठिकाणी खचलेले आहे. पालिकेने या विभागाकडे लक्षं द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.