रत्नागिरी (प्रतिनिधी): मालगुंड समुद्रकिनारी दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. गौरव मुरलीधर टेलर (२२ पहाडी मोहल्ला, ता. बगड, जि. झुनझुन, राजस्थान) व अमित विद्याधर धनकड (२४, ग्राम बस्तावर, ता. चिवाडा, जि. झुनझुन, राजस्थान) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
राजस्थानमधील असून मालगुंड येथील निर्मलनगरी भायवाडी येथून श्री माताजी निर्मलादेवी प्रणित यांच्या ‘सहजयोगा’त हे तरुण सहभागी होण्यासाठी आले होते. मालगुंड समुद्रात हे दोघेही तरुण शनिवारी संध्याकाळी आंघोळीसाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही समुद्रात बुडाले, मात्र याच वेळी किनार्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पण ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. त्यानंतर लाटेच्या प्रवाहाबरोबर हे तरूण बाहेर किनाऱयावर फेकले गेले. तेव्हा हि घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या दोघांनाही तातडीने मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून दोघानाही मृत घोषीत केले.