
मुंबई, (निसार अली) : मालवणीतील वंदे मातरम शिक्षण संस्थेच्या मालवणी उत्कर्ष या शाळेच्या संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थ्यांनी मविविध मागण्यांसाठी बुधवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी पालिका पी उत्तर विभागीय कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. हातात फलक घेऊन व पालिकेविरोधात घोषणा देण्यात आल्या. लवणी परिसरातील शाळांच्या समोरील कचरा कुंड्या हटवणे, ओला कचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, घनकचरा व्यवस्थापन विभाग नियमित करणे, घंटा गाड्या आणि जीपच्या फेऱ्यांची माहिती सार्वजनिक करणे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
प्रभाग समिती अध्यक्ष जया तिवाना यांच्या अध्यक्षतेखाली पालिका अधिकारी व आंदोलकांच्या शिष्टमंडळात संयुक्त बैठक झाली. यावेळी सर्व मागण्या मान्य झाल्या. येणाऱ्या दोन दिवसात अंमलबजावणी सुरू होईल. तसेच ओला कचऱ्यावर प्रक्रियेसाठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली. या शिष्टमंडळात मुख्याध्यापक फिरोज शेख, मुख्याध्यापक फरीद शेख, मीनाज शेख, रिझवान सिद्दीकी, सुरेखा पटेल, राकेश गिरी यांचा समावेश होता.














