मुंबई, (निसार अली) : मालाड पश्चिम स्थानकाजवळ असणार्या पवन हॉटेलपासून ते मार्वे समुद्र किनार्यापर्यंत शेअर टॅक्सीसेवा आजपासून सुरु झाली. याचा मोठ्या प्रमाणावर पर्यटक आणि रहिवाशांना फायदा होणार आहे.
मालाड ते मार्वे किनारापर्यंत प्रतीव्यक्ती २० रुपये आणि मालाड ते मालवणी चर्चपर्यंत १५ रुपये इतके भाडे असणार आहे. ही सेवा शेयरिंग टॅक्सीकमिटीने सुरू केली आहे.
स्थानिक आमदार असलम शेख यांनी या सेवेचे आज उद्घाटन केले. नाशिक ढोल वाजवून प्रवाशांचे स्वागत करण्यात आले, अशी माहिती विक्रम कपूर यांनी दिली.