मुंबई, (निसार अली) : लॉकडाऊन काळात मालवणीतील साक्षर वेल्फेअर सोसायटीच्यावतीने दररोज 1300 गरजूंना जेवणाची सोय उपलब्ध केली आहे. महिनाभरापासून मालवणी, खारोड़ी, अप्पापाडा, कुरार गाव परिसरातील बेघर आणि लॉकडाऊनमुळे ज्यांच्या कामावर सर्वाधिक परिणाम झाला अशा लोकांना दोनवेळच जेवण साक्षर उपलब्ध करून देत आहे.
मजूर, बिगारी, घरकाम करणार्या महिला, रिक्षाचालक आदी असंघटित कामगारांना धान्याच्या किटचे वाटप साक्षरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या साठी संस्थेचे अध्यक्ष सौरभ जोशी, सेक्रेटरी स्नेहा मालिपेड़ी तसेच जेरी बोस व इतर कार्यकर्त्यांचा ताफा अहोरात्र मेहनत घेत आहे.