मालाड, (निसार अली) : ‘कोरोना’ नावाच्या वैश्वीक आपत्तीविरोधात आपण लढतोय. या लढ्यात स्वयंसेवी संस्थांची भुमिका महत्वाची आहे. आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचं भान ठेवत युवा शक्ति सेना या संघटनेने मालाड, मालवणीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर निर्जंतुकीकरण
मोहीम राबवली आहे. या संघटनेचं कार्य मालाडच्या सीमा ओलांडूनही चालू आहे. कांदिवलीच्याही अनेक भागांमध्येही ही संघटना निर्जंतुकीकरण मोहिम राबवित आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून ही संस्था दररोज 200 लोकांना अन्नदान करत आहे. तसेच
मालवणी पोलीस ठाणे व सहायक पोलिस आयुक्त यांचे कार्यालयात निर्जंतुकीकरण केले.