
मुंबई, (निसार अली) : मालाडच्या कुरार गाव येथे २०१५ साली पालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केलेली विजयद्वार नावाची इमारत २५ जुलै २०१७ ला खचण्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. यामुळे मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या इमारतीत एक दवाखाना आहे. सकाळच्या सुमारास डॉक्टरांनी शटर उघडून दवाखाना उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना शटर उघडता येईना. म्हणून त्यांनी बाजुला असणार्या माजी नगरसेवक अजित रावराणे यांच्या कार्यालयात जाऊन मदत मागितली. तेव्हा रावराणे यांना इमारत एका बाजूला खचल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमसह अग्निशमन दल व पालिका कार्यालयाला माहिती दिली.
यानंतर ही इमारत धोकादायक आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले व इमारत खाली करा, असे बजावण्यात आले. या इमारतीत ५० ते ६० रहिवासी राहतात. ते येथून जाण्यास तयार नव्हते. परंतु, परिस्थिती पाहता त्यांनी होकार दर्शविला. आज २६ जुलैला रहिवाशांनी घरातील सामान काढण्यास सुरुवात केली. पालिका शाळेत त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, रहिवाशांनी तेथे राहण्यास नकार दिला आहे. सध्या इमारतीबाहेर दोन पोलीस कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ही इमारत ४० वर्षे जुनी आहे. तीन माळे असलेल्या या इमारतीच्या तळमाळ्यावर असलेल्या सात दुकानात काही ठिकाणी लोखंडी पाइपचे टेकू दिले आहेत. सन २०१५ ला पालिकेने ही इमारत धोकादायक यादीत टाकली होती. नोटीसही बजावली होता. दोन वर्षापूर्वी इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट महानगर पालिकेचे मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल ऑडिटर योगेश पटेल यांनी केले होते. इमारतीची दुरुस्ती आवश्यक असल्याचा अहवाल त्यांनी दिला होता. परंतु, इमारतीच्या पुनर्विकासाच्या नादात रहिवाशांनी दुरुस्तीकड़े दुर्लक्ष केले.
दोन वर्षांपूर्वी या इनारतीचे ऑडिट केले. आजही या इमारतीची दुरुस्ती शक्य आहे. तसे करणे खर्चिक आहे. तेव्हा इमारत पाडून पुनर्विकास करणे योग्य ठरेल. कारण जमीनी खाली असलेली काळी माती आणि त्याठिकाणी जमलेल्या पाण्यामुळे धोका वाढला आहे. – योगेश पटेल,स्ट्रक्चरल ऑडिटर
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>।
प्रशासन आमची मदत करत नाही, असा आरोप रहिवासी दिवेश शाह यांनी केला आहे.
> >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>















