मुंबई, (निसार अली) : काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेला भारत बंद मालाड, मालवणी भागात यशस्वी झाला. मालाडमधील मालवणी क्र. ८ बेस्ट डेपो समोरून काँग्रेस व माकपने संयुक्त रॅली काढून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात घोषणा देत अनेक ठिकाणी वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. रॅलीच्या सुरुवातीला कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
गेट क्र. ६, ७ येथे ही रस्ता रोकोचा प्रयत्न झाला. गेट क्र. ५ येथील सुपर मार्केट काँग्रेस कार्यकर्त्यानी बंद पाडले. दुकाने व व्यावसायिक ठिकाणे सकाळपासून बंद होती. गेट क्र १ येथे आंदोलकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. चारकोप नाका, मिठचौकी, मार्वे रोड जंक्शनवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मालाड, काचपाडा व एसव्ही रोडवरून रॅली मिठचौकी येथे आल्याने लिंक रोड व मार्वे रोड येथे वाहतूक कोंडी झाली होती.
पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करत त्यांना ताब्यात घेतले. रॅलीचे नेतृत्व नगरसेवक वीरेंद्र चौधरी, कमरजहाँ सिद्दीकी, सलमा अलमेलकर, माजी नगरसेवक सिराज शेख, डॉ. नेकसन नाटके, अरविंदर सिंग भाटिया यांनी केले.