
रत्नागिरी, प्रतिनिधी : माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 9 लाख 57हजार 663 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले असून यातून 758 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यातील 273 जणांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 770 पथकांनी तपास मी कामाला सुरुवात केली होती. आता सध्या 1199 पथके घरोघरी भेटी देऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहेत. या अंतर्गत 2 लाख 71 हजार 333 घरांना भेटी देण्यात आल्या यातून एकूण 2 लाख 87 हजार 348
कुटुंबातील 9 लाख 57 हजार 663 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान नागरिकांची ऑक्सीमीटरवर ऑक्सीजन पातळी तपासण्यासह त्यांच्या शरीराचे तापमान तपासणे तसेच सहा मिनिटांची वॉक टेस्ट घेणे आदी तपासण्यांचा समावेश आहे. या तपासणी दरम्यान 40966 घरे बंद असल्याचे आढळून आले आहे यांची पातळी
चालण्याच्या तपासणीनंतर 95 पेक्षा खाली गेली अशांची एकूण संख्या 732 इतकी आढळली आहे. तर ताप सर्दी खोकला असणाऱ्या एकूण व्यक्तींची संख्या 1212 इतकी होती.