मुंबई, (निसार अली) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला. बाबासाहेबांच्या या जन्मस्थानाला डॉ. बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक घोषित करावे, अशी मागणी मालवणीतील जनसेवा सामाजिक संस्थेने मध्य प्रदेशात जाऊन केली. संस्थेच्या पदाधिकार्यांनी थेट महूचे जिल्हाधिकारी अजय देव शर्मा आणि अप्पर जिल्हाधिकारी शमीमुद्दीन यांची भेट घेतली आणि त्यांना त्यांच्या मागणीचे निवेदन दिले.
संस्थेची मागणी सरकारपर्यंत पोहचवू, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास भैसाने यांनी दिली आहे.