मुंबई : 20.7 अब्ज डॉलर्स महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीने आज त्यांच्या ‘विथ यू हमेशा’ या ग्राहकसेवा डिजिटल उपक्रमाने नोंदणीकृत ग्राहकांचा आठ लाखांचा टप्पा पार केल्याचे जाहीर केले. वेब आणि मोबाइल अशा दोन्ही व्यासपीठावर उपलब्ध असलेला हा उपक्रम वाहन क्षेत्रातील विक्रीपश्चात तंत्रज्ञानाच्या बाबतीत नवा पायंडा पाडणारा असून नुकताच त्याचा सहावा वर्धापन साजरा करण्यात आला.
इंडस्ट्रीत पहिल्यांदाच सादर करण्यात आलेल्या विविध वैशिष्ट्यांचा समावेश असलेले हे अप तीन लाख ग्राहकांनी डाउनलोड केले असून त्याला गुगल प्लेवर स्पर्धकांमधील सर्वात उच्च – 4.3 रेटिंग मिळालेले आहे. सहावा वर्धापनदिन साजराकरण्यासाठी त्यात चॅटबॉट आणि डिजीलॉकर ही दोन नवी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
चॅटबोटचे नाव ‘विथ यू हमेशा टॉटबॉट’ असे ठेवण्याच आले असून तो महिंद्राच्या विक्री पश्चात विभागासाठीचा ऑटोमेटेड चॅटिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याद्वारे ग्राहकांना त्यांची वाहनांची जलद माहिती दिली जाते आणि सेवा आरक्षण, अभिप्राय,वितरक शोधणे, एसओएस विनंती, वॉरंटी वाढवणे, रोडसाइड असिस्टन्ससाठी समाविष्ट करणे इत्यादी सेवा मित्रांशी चॅट करण्याइतक्या सहज व वेगाने करता येतात. नजीकच्या भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्राचा आणखी विकास होऊनग्राहक सेवा क्षेत्रात क्रांती घडणार असल्याचे लक्षात घेत महिंद्राने चॅटबॉटला ‘टॉट’ असे समर्पक नाव दिले आहे. विथ यू हमेशा टॉटबॉट’ हे सुद्धा नवनव्या गोष्टी शिकून विकसित होणार आहे.
डिजिटलॉकर वैशिष्ट्यामुळे ग्राहकांना त्यांचे वाहन आणि आरसी, वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांसारखी वैयक्तिक कागदपत्रे केव्हाही वापरता येणार आहेत. ही ई- कागदपत्रे अधिकृत असून देशभराती वाहतूकविभागातर्फे स्वीकारली जातात.
महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या वाहन विभागाचे विक्री आणि विपणन प्रमुख विजय नाक्रा म्हणाले, ‘अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या बाबतीत, मग ते आमच्या उत्पादनांशी संबंधित असो किंवा ग्राहकांना आमच्यातर्फे दिल्या जाणाऱ्यासेवा असोत, महिंद्रा कायमच अग्रेसर राहिले आहे. विथ यू हमेशा हा उपक्रम ग्राहकांचा वाहन मालकीचा अनुभव विविध सेवांच्या मदतीने पूर्णपणे बदलून टाकू शकणारा आहे. महिंद्रामध्ये आम्ही येत्या काळात अधिकाधिक नाविन्यपूर्ण आणिउपयुक्त वैशिष्ट्ये उपलब्ध करण्यासाठी बांधील आहोत.’
2013 मध्ये याचे लाँच झाल्यापासून विथ यू हमेशाने ग्राहकांना मोबाइल व वेबसह सर्व डिजिटल माध्यमांतून कायम पारदर्शकता, सोयीस्करपणा आणि वैयक्तिक अनुभव सफाईदारपणे पुरवला आहे.
विथ यू हमेशा अनुभवाबद्दल
- ऑनलाइन सर्व्हिस अपॉइंटमेंट आरक्षण (अप आणि संकेतस्थळ)
– गरजेनुसार तारीख आणि वेळ आरक्षित करा
– पिकअप आणि ड्रॉप सेवेची मागणी करा
– Book required date & time slot
– ई- जॉब कार्ड तयार करा
– अपॉइंटमेंटची वेळ बदला किंवा रद्द करा
- ऑनलाइन रोडसाइड असिस्टन्स धोरण आणि विस्तारित वॉरंटी खरेदी (अप आणि संकेतस्थळ)
– पात्रता तपासा आणि ऑनलाइन प्रवेश घ्या
– ईएमआय पर्याय उपलब्ध
- ऑनलाइन पेमेंट (अप आणि संकेतस्थळ)
– केवळ महिंद्रा वर्कशॉप्समध्ये घेतलेल्या सेवांसाठी ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिला जाईल
- सर्व्हिस हिस्ट्री आणि इनव्हॉइस (अप आणि संकेतस्थळ)
– गाडीच्या दुरुस्तीचा पूर्वइतिहास आणि इन्व्हॉइस प्रत पाहाता व डाउनलोड करता येऊ शकतो.
- लाइव्ह चॅट ((अप आणि संकेतस्थळ)
-ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी अप तसेच संकेतस्थळ या दोन्हीवर लाइव्ह चॅट
-अल्ट्रास जी4, रेक्सटॉन आणि एक्सयूव्ही 500 च्या ग्राहकांना अपद्वारे व्हिडिओ कॉलिंगची सुविधा
- एसओएस वैशिष्ट्य (केवळ अपवर)
– केवळ एक बटन दाबून एसओएसची विनंती करता येईल आणि हेल्पलाइन टीम ग्राहकांना तातडीने संपर्क साधेल.
- रिन्यूवल रिमाइंडर्स (अप आणि संकेतस्थळ)
- विमा, पीयूसी, परवाना नूतनीतरणारी रिमाइंडर्स आणि आरएसए व सर्वसाधारण वॉरंटीपूर्वी सूचना
- पर्पल क्लब प्लस (केवळ अपवर)
– अल्ट्रास जी4, रेक्सटॉन आणि एक्सयूव्ही 500 च्या ग्राहकांसाठी पॉइंट्सवर आधारित लॉयल्टी प्रोग्रॅम
- डिजीलॉकर (केवळ अपवर)
– सरकारी संकेतस्थळाबरोब एकत्रित केल्यामुळे ग्राहकाला वाहनाची कागदपत्रे उदा. आरसी, वाहन चालवण्याचा परवाना, पॅन कार्ड, आधार कार्ड इत्यादी उपलब्ध होणार
- विथ यू हमेशा टॉटबॉट (अप आणि संकेतस्थळ)
– हे बॉट ग्राहकांना वाहनाशी संबंधित माहिती मिळवून देण्यास आणि सर्व्हिस आरक्षण, अभिप्राय, वितरक शोधणे, एसओएसची विनंती, विस्तारित वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टन्ससाठी प्रवेश अशा व्यवहारांसाठी मदतकरेल.
या डिजिटल प्लॅटफॉर्मला गेल्या 6 वर्षांत विविध पुरस्कार मिळालेले आहेत – टाइम्स नेटवर्कचा एक्सपिरीएन्शियल अँड ब्रँड एक्सपिरीयन्स, इंकस्पेलतर्फे डायव्हर्स ऑफ डिजिटल, द मॅडीजतर्फे रिलेशनशीप बिल्डींग/रिमार्केटिंग पुरस्कार,झेनडेस्कतर्फे बेस्ट कस्टमर ट्रान्सफर्मेशन.