मुंबई, 1 जुलै : 19.4 अब्ज डॉलर्सच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. कंपनीच्या शेती उपकरण विभागाने (फार्म इक्विपमेंट सेक्टर – एफईएस) आज जून 2020 मधील ट्रॅक्टर विक्रीची आकडेवारी जाहीर केली.
जून 2020 मध्ये देशांतर्गत विक्री 35,844 युनिट्सवर गेली असून जून 2019 मध्ये ही आकडेवारी 31,879 युनिट्स होती.
जून 2020 मधील एकूण ट्रॅक्टर विक्री (देशांतर्गत आणि निर्यात) 36,544 युनिट्स होती, तर गेल्या वर्षी याच कालावधीत विक्रीचा हा आकडा 33,094 युनिट्सवर गेला होता.
या महिन्यातील निर्यात 700 युनिट्स होती.
या कामगिरीविषीय महिंद्रा अँड महिंद्राच्या शेती उपकरण विभागाचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले, ‘जून 2020 मध्ये आम्ही देशांतर्गत बाजारपेठेत 35,844 ट्रॅक्टर्सची विक्री केली असून गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या विक्रीत 12 टक्के वाढ झाली आहे. जून महिन्यात झालेली ही आमची आतापर्यंतची दुसरी सर्वाधिक विक्री आहे. नैऋत्य पावसाचे वेळेवर आगमन, विक्रमी रबी पीक, शेती उपक्रमांसाठी असलेला सरकारचा पाठिंबा आणि खरीप पिकाच्या पेरणीत झालेली चांगली प्रगती यांमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण आहे. त्याचबरोबर ग्रामीण बाजारपेठेतील रोखीचा प्रवाह उंचावल्यानेही जून महिन्यात ट्रॅक्टरच्या मागणीला चालना मिळाली. येत्या काही महिन्यांतही ही मागणी अशीच राहील असा अंदाज आहे. निर्यात बाजारपेठेत आम्ही 700 ट्रॅक्टर्सची विक्री केली आहे.’
शेती उपकरण विभाग (एफडी+एसडी+ग्रोमॅक्स) | ||||||
जून | एकत्रित जून | |||||
आर्थिक वर्ष 20 | आर्थिक वर्ष 21 | %
बदल |
आर्थिक वर्ष 20 | आर्थिक वर्ष 21 | %
बदल |
|
देशांतर्गत | 31879 | 35844 | 12% | 82913 | 64577 | -22% |
निर्यात | 1215 | 700 | -42% | 3437 | 1080 | -69% |
एकूण | 33094 | 36544 | 10% | 86350 | 65657 | -24% |
*निर्यातीमध्ये सीकेडीचा समावेश