मुंबई : पूर्व ते पश्चिम भारत अशी मोहीम पूर्ण केल्याबद्दल महिंद्रा मोजोची वेगवान मोटरसायकल म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे अरुणाचल प्रदेशातील तेझू ते गुजरातमधील कोटेश्वर हे ३,७०६ किमी अंतर केवळ ८५ तासांत महिंद्रा टू व्हीलर्सच्या ३०० सीसी मोजोने पूर्ण केले आहे.
सुदीप एनएस व योगेश चव्हाण यांनी ही मोहीम पूर्ण केली. अरुणाचल प्रदेशातील तेझू येथे मोहीम सुरू झाली आणि गुजरातमधील कोटेश्वर येथे समाप्त झाली. हेच अंतर पार करण्याची या आधीची नोंद १०७ तासांची आहे.
सुदीप व योगेश यांना मोजो खरेदी केल्यानंतरच ही मोहीम शक्य झाली. स्थिरता, आराम व सुरक्षा ही मोजोची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच मोहिमेमध्ये असलेल्या आव्हानांना पार करणे त्यांना सोपे गेले.
महिंद्रा टू व्हीलर्स लि.चे सेल्स, मार्केटिंग व प्रॉडक्ट प्लानिंगचे सीनिअर जनरल मॅनेजर नवीन मल्होत्रा म्हणाले की, “मोजोने स्वत:चे वेगळेपण पुन्हा सिद्ध केले आहे. सुदीप आणि योगेश यांनी मिळवलेले यश खरोखरच कौतुकास्पद आहे. मोजोचे अत्याधुनिक इंजिन जास्तीच्या अंतरासाठी कसे महत्वाचे ठरते, हे ही या मोहीमेमुळे मोटरसायकलप्रेमींना समजले.”
“मी गेली अनेक वर्षे रायडिंग करत आहे आणि विविध प्रकारच्या बाइक चालवल्या आहेत. परंतु, गाडी चालवताना सहजपणा, आरामदायीपणा आणि रायडरला मिळणारा आत्मविश्वास या बाबतीत मोजोची सफारी अद्वितीय आहे. त्यामुळेच या मोहिमेसाठी मोजोची निवड करण्यात आली”, असे योगेश चव्हाण यांनी सांगितले.
नवनव्या ठिकाणी जाण्याची उत्सुकता तुम्हाला असेल तर मोजोपेक्षा उत्तम बाइक दुसरी नाही, असे सुदीप एनएस यांनी सांगितले.